पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेत नकली मद्य निर्मिती

औरंगाबाद : औरंगाबाद येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने काल टाकलेल्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेचा फलक लावून आतमध्ये बनावट मद्य निर्मितीचा उद्योग सुरु होता.

पोलीस भरती प्रशिक्षण संस्था चालक अशोक डवले हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने आडगाव येथे बनावट मद्य निर्मितीचा उद्योग बिनबोभाट सुरु होता. बाहेरून पोलीस भरती प्रशिक्षण संस्थेचा भलामोठा फलक असल्यामुळे त्याच्या या धंद्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नव्हते. मात्र या प्रकाराची माहिती राज्य उत्पादना शुल्क विभागाला समजली होती. त्या माहितीच्या आधारे औरंगाबाद शहर विभागाचे निरीक्षक शरद फटांगडे व निरीक्षक जावेद कुरेशी यांच्या पथकाने धाड टाकली. या धाडीत नकली मद्य निर्मीतीसाठी लागणाऱ्या 19 लाख 7 हजार १६० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here