जनावरांची वाहतूक करणा-या चालक, क्लिनरला मारहाण

काल्पनिक छायाचित्र

जमावाविरुद्ध गुन्हा दाखल , तेरा जण अटकेत

जळगाव : गुरे  वाहून नेत असतांना वाटेत पारोळा शहरानजीक वसंतवाडी येथे जमावाने 20 जुलै रोजी चालक व वाहकास बेदम मारहाण केली होती. चोपडा येथून मालेगाव येथे गुरे वाहून नेली जात असतांना ही घटना घडली होती. या घटनेत जमावाकडून चालक व क्लिनर यांना दोराने बांधून अमानुषपणे मारहाण करण्यात आली होती. 

पारोळा येथील सरकारी रुग्णालयात पोलिसांनी जखमींवर वैद्यकीय उपचार केल्यानंतर त्यांच्यावर प्राणी प्रतिबंध कायद्यानुसार रितसर कारवाई केली. न्यायालयाने चालक व क्लिनर यांना जामिन मंजुर केल्यामुळे त्यांची सुटका झाली.

या प्रकरणातील जमावाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गु.र.न. ११६/२० भा.द.वि. ३०७, ३२४, ३२३, १४३, १४७, १४९ व ३७(१)(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तेरा जणांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि.निलेश गायकवाड करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here