आजचे राशी भविष्य (24/2/2022)

मेष : शब्द जपून वापरावे लागतील. विद्यार्थी वर्गाला यशप्राप्ती होईल.

वृषभ : मध्यम फलदायी दिवस राहील. विविध प्रकारचे अनुभव येतील.

मिथुन : कला आणि क्रिडा क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. घरगुती वाद संपुष्टात येतील.

कर्क : विवाहाची बोलणी असल्यास पुढे सरकतील. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना अनुकूल दिवस.

सिंह : अचानक धनलाभाचे योग जुळू शकतात. नोकरीत वरिष्ठांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.

कन्या : प्रगतीचे मार्ग तयार होतील. मनोकामना पुर्ण होतील.

तुळ : न्यायालयीन प्रक्रियेत सकारात्मक वार्ता मिळेल. समस्येचे निराकरण होईल.

वृश्चिक : योग्य निर्णय घेतले जातील. आर्थिक लाभाचे योग जुळून येतील.

धनु : उत्तम प्रकारचे कुटुंबसौख्य लाभेल. मौल्यवान वस्तूंची जपणूक करावी लागेल.

मकर : मनाप्रमाणे अनेक गोष्टी घडतील. कौटूंबिक गरजा पुर्ण करण्यात वेळ जाईल.

कुंभ : गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. मुलांच्या प्रगतीमुळे समाधान लाभेल.

मीन : नोकरी व्यवसायानिमीत्त दगदग वाढेल. जुन्या ओळखी कामात पडतील.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here