पोलीस असल्याची बतावणी करत 15 लाखाची लुबाडणी

काल्पनिक चित्र

पुणे – कोंढवा पोलसांच्या पथकाने केली एकाला अटक

पुणे : लॉकडाऊन दरम्यान गोदाम सुरु ठेवल्याचे सांगत एलसीबीचे पोलीस असल्याची बतावणी करुन चौघांनी एका जणाकडून बळजबरी एक लाख रुपये नेले होते. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चौघांपैकी  एकाला अटक केली आहे. अटकेनंतर मात्र वेगळाच प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी एक लाखात नव्हे तर  तब्बल १५ लाखात लुबाडले गेल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी प्रकाश पेमाराम भाटी (३२) रा. अजमेरा पार्क, कोंढवा खुर्द यांनी कोंढवा पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. सदर घटना २२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ दरम्यान धर्मावत पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या एका गोदामात घडली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिस स्टेशनच्या पथकाने विनोद ऊर्फ बाळ्या लक्ष्मण गोडांबे (३३) रा. पाषाण) यास अटक करण्यात आली आहे.

गोडांबे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, मारामारी असे विविध गुन्हे दाखल आहेत.त्याच्या साथीदारांची माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here