खासदार, आमदार राणा दाम्पत्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा

अमरावती : संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित महोत्सवादरम्यान कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार व आमदार राणा दाम्पत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गाडगेनगर स्टेशनला दाखल गुन्ह्यात खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्यासह संजय हिंगासपुरे, जितु दुधाने, सचिन भेंडे, पराग चिमोटे, रवी अडोकार, सुरज मिश्रा, बंटी टाके, अविनाश काळे, राहुल काळे, शुभम उंबरकर, मंगेश कोकाटे, उपेन बघेल, बाळु इंगोले, संतोष कोलटेके यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांविरुद्ध संचारबंदी उल्लंघन, साथरोग अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here