ओबीसी आरक्षणाची सुनावणी ढकलली पुढे

सुप्रीम कोर्ट

सर्वोच्च न्यायालयात सुरु असेलल्या आजच्या सुनावणीकडे जनतेचे विशेषत: राजकीय मंडळींचे लक्ष लागले होते. सदर सुनावणी आता बुधवारी होणार आहे. असे असले तरी राज्यात ओबीसी अनारक्षित करुन खुल्या प्रवर्गातून निवडणूक घेण्यात येत असलेल्या जागांवर मंगळवारी मतदान होणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील नागरिकांचा मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी जागांवरील निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात तसेच ओबीसी आरक्षण कायम ठेवण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार होती. काही माहिती सादर करण्यासाठी राज्य सरकारच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दोन दिवस अवधी मागितला. आता ही सुनावणी बुधवारी होणार आहे.

राज्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात 95 नगरपंचायतींसह भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी सात पंचायत समित्‍या तसेच सांगली-मिरज-कुपवाड या एका महानगरपालिकेच्या पोट निवडणुकान्साठी मंगळवारी मतदान होत आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here