मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी‎

माजलगाव : माजलगाव‎ तालुक्यातील अल्पवयीन‎ मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाल्याप्रकरणी आरोपी किसन जगन्नाथ थावरे (रा.‎ आनंदगाव) यास पाच वर्ष‎ सक्तमजुरीची शिक्षा तसेच 9 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अप्पर सत्र न्यायाधीश एस.पी.‎ देशमुख यांनी सदर दिला आहे.

14 मार्च 2021 रोजी दुपारच्यावेळी अल्पवयीन पिडीत मुलगी तिच्या बहिणीसोबत पाणी भरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी किसान थावरे याने तिचा विनयभंग केला होता. अल्पवयीन पिडीत मुलीच्या आईने याप्रकरणी विनयभंगासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. माजलगाव सत्र न्यायालयात सदर खटल्याचे कामकाज पूर्ण झाले. सरकार पक्षाच्या वतीने या खटल्यात आठ साक्षीदार तपासण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here