गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवा : गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे : गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, अशी सूचना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकी दरम्यान दिली.गृहमंत्री अनिल देशमुख आज पुणे येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या बैठकीस यावेळी पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त बच्चनसिंह, मितेश घट्टे व पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पिंपरी पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना श्री देशमुख म्हणाले की कायदा सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे काम पोलिसांना करावे लागते. गुन्हेगारांवर वचक बसवण्यासह गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वापरामुळे गुन्हेगारांच्या हालचालींवर नजर ठेवणे शक्य होते.  यावेळी पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी शहरातून तडीपार गुन्हेगार पुन्हा शहरात आल्यास त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एक्स्ट्रा अ‍ॅप (ट्रॅकिंग ऑफ एक्सट्रनी)ची विस्तृत माहिती यावेळी दिली.

या अँपच्या मदतीने  आतापर्यंत वीस तडीपारांवर लक्ष ठेवले जात आहे. या अँपचे माध्यमातून नजर ठेवण्यात येत असताना तडीपार आदेशाचा भंग करणा-या आरोपीला न्यायालयाने ४ महिने कैद व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जिल्ह्यात राबवलेल्या ‘स्मार्ट पोलिसिंग’ योजनेची देखील माहिती यावेळी दिली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here