पोलिस निरीक्षकासह सात जणांना सश्रम कारावास

अकोला : मुळ उत्पन्नापेक्षा जादा संपत्ती जमवल्याप्रकरणी विशेष न्यायालयाचे न्या. एच.के. भालेराव यांच्या न्यायालयाने पोलिस निरीक्षकासह त्यांची पत्नी, मुलगा, मेहुणा व मित्र अशा सर्वांना दोषी ठरवले आहे. पोलीस निरीक्षक मनोहर बळीराम सोनोने, त्यांची पत्नी राजकन्या, मुलगा योगेश व मेहुणा अनिल नथू राऊत. साडू अरुण लखुजी बांगर व मित्र हुसेन अब्दुल गफ्फार, शेख रफिक अब्दुल गफ्फार असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या सर्वांची नावे आहेत. सर्व दोषींना प्रत्येकी दोन वर्ष सश्रम कारावास सुनावला आहे.

अकोला जिल्ह्यातील दर्यापूर येथील मुळ रहिवासी असलेले पोलीस निरीक्षक मनोहर सोनोने हे सर्व प्रथम 1972 मध्ये पोलीस उप निरीक्षक म्हणून पोलीस सेवेत आले. सन 1997 पासून त्यांच्या अपसंपदेबाबत चौकशी सुरु झाली होती. तपासाअंती त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून  सन 2000 मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरल्यानंतर न्यायालयाने आरोपी मनोहर बळीराम सोनोने यांनी अपसंपदा जमा केल्याप्रकरणी दोन वर्षाचा सश्रम कारावास व पन्नास हजार रुपये  दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी शिक्षा, आरोपी राजकन्या मनोहर सोनोने, योगेश मनोहर सोनोने, अनिल नथ्थु राऊत, अरुण लखुजी बांगर, शे. हुसेन अब्दुल गफ्फार, शे. रफिक अब्दुल गफ्फार यांना अपसंपदा संपत्ती जमा केल्याबाबत दोन वर्षांचा सश्रम कारावास व प्रत्येकी पंचवीस हजार दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी शिक्षा सुनावली आहे. उपपोलिस अधीक्षक पंजाबराव एच. देशमुख, अरविंद पांडे, पी. डी. गवई, एस.एल.संघु, एम.ए. क्षीरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here