फरार बुकींना नाशिकला अटक

औरंगाबाद : औरंगाबाद येथे क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळणा-या सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. या सहापैकी नोव्हेंबर महिन्यात तीन जण पोलिसांच्या तावडीत सापडले होते व इतर तिघे फरार होण्यात यशस्वी झाले होते. फरार झालेले तिघे नाशिक येथील होते.

फरार असलेले तिघे नाशिक शहरात आले असल्याचे समजताच औरंगाबाद सायबर पोलिसांनी त्यांना सापळा रचून अटक केली आहे.  सद्दाम झुलेकार शेख, अमित मदन बुऱ्हाडे आणि अमोल भास्कर कापडणीस (सर्व रा. नाशिक) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. तबरेझ खान कलीम खान, वसीम खान अक्रम खान आणि आसेफ शेख रहीम शेख यांना अगोदरच अटक करण्यात आली होती.

नोव्हेंबर महिन्यात सायबर पोलिसांनी हर्सूल भागात सट्टे लावणाऱ्यांवर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून धाड टाकली होती. अटकेतील तिघांना 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सायबर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्यासह सहायक निरीक्षक अमोल सातोदकर, उपनिरीक्षक राहुल चव्हाण, वारे, जमादार साबळे, दंडे, प्रकाश काळे, पोलिस नाईक सुशांत शेळके, गोकुळ कुतरवाडे, रवी पोळ, संदीप पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here