आजीचा खून करणाऱ्या नातवाला जन्मठेप

अमरावती : अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने आजीचा हत्या करणा-या नातवाला जन्मठेप सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक 1) एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने दिलेल्या सुनावणीत आरोपी नातवाला जन्मठेप व  दहा हजार रुपये दंड तसेच  दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. 27 ऑक्टोबर 2019 रोजी सायंकाळी गाडगेनगर पोलिस स्टेशन हद्दीत राठी नगर भागात सदर हत्येची घटना घडली होती.

स्वप्निल उर्फ संतोष तुळशीराम कोडापे (30), रा. बांदेकर प्लॉट, राठीनगर अमरावती असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे तर शांताबाई चांदेकर (75) असे हत्या झालेल्या आजीचे नाव आहे. सरकार पक्षाच्या बाजूने  जिल्हा सरकारी वकील अँड. परीक्षित गणोरकर यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी बाबाराव मेश्राम व अरुण हटवार यांनी कामकाजात सहकार्य केले. गाडगेनगर पोलीस स्टेशनचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक मनिष वाकोडे व पीएसआय पंकज ढोके यांनी तपास पूर्ण केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here