पाचोरा कॉंग्रेसच्या वतीने ना. दानवे यांना निवेदन

जळगाव : पाचोरा रेल्वे स्टेशनवर सुपरफास्ट गाड्यांना थांबा द्यावा तसेच पीजे रेल्वे सुरु करण्यासह विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना देण्यात आले. पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.

पाचोरा हे जंक्शन रेल्वे स्टेशन असून येथील मालधक्क्यापासून रेल्वे प्रशासनाला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याचे यावेळी सचिन सोमवंशी यांनी ना. दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांच्या समवेत अल्पसंख्याक जिल्हा सचिव इरफान मनियार, अमजद मौलाना, रवी पाथरवट आदी उपस्थित होते. पाचोरा स्टेशनसह सोयगाव, पारोळा, भडगाव, एरंडोल, जामनेर तालुक्यातील जनतेच्या सोयीसाठी विदर्भ एक्सप्रेस, अमरावती मुंबई एक्सप्रेस, आझाद हिंद एक्सप्रेस, बंगलोर अहमदाबाद एक्सप्रेस, ओकाया रामेश्वर एक्सप्रेस, जबलपुर मुंबई गरीब रथ, पंजाब मेल या गाड्यांना थांबा देण्यात यावा अशी आग्रही मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. भुसावळ-मुंबई पॅसेंजर, भुसावळ देवळाली या दोन्ही गाड्या कोरोना कालावधी पासून बंद झाल्या आहेत. त्या गाड्या सुरु करुन अप-डाउन करणार्‍या प्रवाशी वर्गाला दिलासा द्यावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here