मोबाइल हिसकावून पळणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

जळगाव : पायी चालणा-या तरुणाच्या हातातील मोबाईल हिसकावत पलायन करणा-या अल्पवयीन मुलाला दुचाकीसह एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेने अल्पवयीन गुन्हेगर हाती लागला असून त्याच्यावर भुसावळ शहर पोलिस स्टेशनला देखील चोरीचा एक गुन्हा दाखल असुन तो न्यायप्रविष्ठ आहे.

अमित नरसिंग पावरा हा यावल तालुक्यातील तरुण जळगावच्या सिंधी कॉलनी भागातून 23 जानेवरी रोजी सायंकाळी पायीपायी जात होता. त्याचवेळी कंजरवाड्याकडून आलेल्या दोघा जणांनी त्याच्या हाताला हिसका देत त्याच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रकार घडला. हाती आलेला मोबाईल घेत अल्पवयीन गुन्हेगार बालकाने भुसावळच्या दिशेने पलायन केले. त्यावेळी वाटेत एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक मुदस्सर काझी, पोलिस कर्मचारी किरण पाटील हे विनामास्क असलेल्या लोकांवर कारवाई करत होते. पळून जात असलेल्या दुचाकीस्वार अल्पवयीन बालकाचा त्यांना संशय आला. त्यांनी त्याचा बराच वेळ पाठलाग केला. त्याला हॉटेल गौरव नजीक ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्याला बोलते करुन त्याच्या ताब्यातील चोरीचा एलजी कंपनीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला. त्याने गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटार सायकल व चोरीचा मोबाईल असा एकुण 80 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला चोरीचा एक गुन्हा दाखल असून न्यायप्रविष्ठ आहे. पो.नि. शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार आनंदसिंग पाटील या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत. सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक योगेश बारी, विकास सातदिवे, सुधिर सावळे यांची मदत झाली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here