98 लाखांचा गंडा घालणारे दाम्पत्य अमरावतीमधून फरार

काल्पनिक छायाचित्र

अमरावती : चिटफंडच्या नावे जमा केलेली 98 लाख रुपयांची रक्कम घेत अमरावती शहरातून दाम्पत्य फरार झाले आहे. मिलन हिम्मतलाल पोपट (35) व ममता मिलन पोपट (31) दोघे रा. श्रीनिवास अपार्टमेंट अंबिकानगर अमरावती असे फरार झालेल्या दोघांची नावे आहेत. शेकडो लोकांची सुमारे 98 लाख 74 हजार रुपयात फसवणूक झाल्याप्रकरणी राजापेठ पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यावसायिक दिनेश प्रभुदास सेठीया (43, रा. एकनाथपूरम अमरावती) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार शेकडो व्यक्ती अनेक महिन्यांपासून मिलन पोपट व ममता पोपट यांच्याकडे चिटफंडमध्ये रकमा गुंतवणूक करत होते. सुरळीत सुरु असलेला व्यवहार नंतर बिघडला. ऑक्टोबर व नोव्हेंबर 2021 या दोन महिन्याची देय असलेली रक्कम पोपटने गुंतवणूकदारांना दिली नाही व कार्यालयात देखील आला नाही. त्याचा मोबाईल देखील बंद झाला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here