राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जळगावला होणार सदस्यता नोंदणी

जळगाव : आगामी महानगरपालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी सदस्यता नोंदणी उपक्रम राबवला जाणार आहे. 25 जानेवारी रोजी रा. कॉ. पक्षाच्या या अभियानला सुरुवात केली जाणार आहे. तसेच वन बुथ टेन युथ ही संकल्पना देखील राबवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा कार्यालयात सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या शुभ हस्ते व जिल्हाध्यक्ष (ग्रामिण) रविंद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत खोटे नगर येथुन सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात होणार आहे.

या बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख लीलाधर तायडे, संघटन प्रमुख राजू मोरे, उपाध्यक्ष भगवान सोनवणे, किरण राजपूत, अमोल कोल्हे, आबा चौधरी, दुर्गेश पाटिल, अनिल पवार, अकिल पटेल, सरचिटणीस सुनील माळी, दिलीप माहेश्वरी, विशाल देशमुख, रहीम तडवी, चिटणीस अक्षय सोनवणे, किशोर सुर्यवंशी, अमोल सोनार, सुष्मीता भालेराव, आकाश विश्वे, महेश भोळे, अनिरुद्ध जाधव तसेच पक्षाचे सदस्य उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here