आईच्या निधनास कारणीभूत मुलास नऊ वर्षे सक्तमजुरी

जळगाव : चारित्र्याच्या संशयाने पछाडलेल्या मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर कुऱ्हाडीने हल्ला करत तिच्या मरणाला कारणीभूत ठरलेल्या मुलास नऊ वर्ष सक्तमजुरीसह दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. समाधान वाल्मीक शेवाळे (रा. शिंगटेमळा, चाळीसगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी समाधान शेवाळे याने त्याची आई पमाबाई हिच्या चारित्र्यावर संशय घेत कु-हाडीने घाव घातले होते. त्यावेळी त्याचे वडील मुलीच्या घरी गेले होते.

या हल्ल्यात समाधानची आई मरण पावली होती. या घटनेच्या वेळी कुणीही साक्षीदार नव्हता. मात्र या घटनेनंतर नातेवाईकांकडे पैशांची मागणी करतांना त्यांच्याजवळ त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. त्या कबुलीच्या आधारे त्याच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्या. एस. जी. ठुबे यांच्या न्यायालयात याप्रकरणी सुनावणी पुर्ण झाली. 19 साक्षीदार तपासणीनंतर आरोपी समाधानची बहिण व मेहुणे फितुर झाले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. सुरेंद्र काबरा यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी तुषार मिस्तरी व दिलीप सत्रे यांनी त्यांना मदत केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here