जनमत प्रतिष्ठान, वृत्तपत्र स्टॉल संघटनेच्या वतीने प्रजासत्ताक दिन

जळगाव : जनमत प्रतिष्ठान व वृत्तपत्र स्टॉल संघटनेकडून आज जळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकालगत राजेंद्र मुळीक यांच्या न्युजपेपर स्टॉलवर 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानाचे अध्यक्ष पंकज नाले तसेच वृत्तपत्र स्टॉल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्यासह बिस्कीटांचे वितरण करण्यात आले. जनमत प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक उपक्रमांसाठी अग्रेसर असल्याचे राजेंद्र मुळीक यांनी यावेळी आवर्जुन कथन केले. जनमत प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजु व गोरगरिब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे फायदा झाला असून जनमत प्रतिष्ठान नेहमीच विद्यार्थीहितासाठी धडपड करत असल्याचे देखील यावेळी राजेंद्र मुळीक यांनी उपस्थितांना सांगितले. याप्रसंगी जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले,वृत्तपत्र स्टॉल संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र मुळीक, मेहताजी, निलेश चव्हाण, दिनेश चव्हाण, प्राध्यापक विजय वानखेडे, हर्षाली पाटील, बापू सोनार, योगेश वाणी, विजय सोनवणे, सुबोध क्लासेसचे आर. सी. पाटील, गणेश जोशी आदी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here