आजचे राशी भविष्य (18/3/2022)

आजचे राशी भविष्य (18/3/2022)

मेष : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना नव्या संधी मिळण्याची शक्यता. जोडीदाराचे चांगले सहकार्य लाभेल.

वृषभ : कौटुंबिक सुख, समृद्धी वृद्धिंगत होवून सुख समाधान लाभेल. तज्ज्ञांचा सल्ला लाभदायक ठरेल.

मिथुन : प्रिय व्यक्तीची गाठ-भेट होण्याचे योग आहेत. नोकरीत बढतीचे संकेत मिळण्याची शक्यता.

कर्क : अति उत्साहात कामे करताना तब्बेतीकडे देखील लक्ष द्या. हितशत्रूंपासून सावध रहा.

सिंह : नवीन तंत्रज्ञान व्यापारात लाभदायक ठरेल. गुंतवणुक फायदेशीर ठरेल.

कन्या : स्थावर संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता. बेरोजगारांना नोकरीच्या नविन संधी मिळतील.

तुळ : सामाजिक प्रशंसेस पात्र रहाल. स्वयंरोजगाराच्या क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

वृश्चिक : प्रगतीचे मार्ग योग्य त्या प्रमाणात प्रशस्त होतील. ध्यानधारणेतून मानसिक शांतता मिळेल.

धनु : प्रिय व्यक्तीची चांगली साथ मिळून प्रलंबित कामे पूर्ण होतील. करिअरचे मार्ग प्रशस्त होतील.

मकर : मिळकतीचे नवनवीन मार्ग उपलब्ध होवू शकतात. अचानक धनलाभाचे योग.

कुंभ : जबाबदारीकडे दुर्लक्ष करु नका. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली गोष्ट ऐकायला मिळेल.

मीन : अध्यात्मिक क्षेत्रात मन रमेल. हाती घेतलेली कामे पूर्ण झाल्यामुळे मनाला समाधान लाभेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here