आजचे राशी भविष्य (21/3/2022)

आजचे राशी भविष्य (21/3/2022)

मेष : हाती घेतलेले काम मन लावून पुर्ण केले जाईल. महत्त्वाच्या विषयावर चर्चा केली जाईल.

वृषभ : लहान मोठ्या प्रवासाची शक्यता आहे. दिनक्रम व्यस्त राहिल.

मिथुन : वादाचे प्रसंग कसे टाळले जातील यासाठी प्रयत्नशील रहावे. आत्मविश्वासाने काम हा योग्य उपाय

कर्क : सहजासहजी कुणावर विश्वास ठेवू नका. दिवसाच्या उत्तरार्धात एखादे महत्वाचे काम होवू शकते.

सिंह : शांतपणे काम करा. कुणाच्या दडपणाखाली निर्णय घेवू नका. कायदेशीर वाद टाळा.

कन्या : रचनात्मक व कलात्मक कामात आजचा दिवस जाईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळवा.

तुळ : कोणताही निर्णय घेतांना वेळ मागून घ्या. दिवस व्यस्त राहील.

वृश्चिक : सारासार विचार करुन कामे केल्यास अनेक प्रश्न सहज सुटतील. निष्काळजीपणा टाळणे गरजेचे.

धनु : प्रतिकूल परिस्थितीत धैर्य आणि संयमाची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक गोष्टी साध्य होतील. 

मकर : व्यवसायात गुणवत्तेसाठी तडजोड करु नका. व्यवसाय विस्तारासाठी विचार करावा.

कुंभ : मनासारखे काम झाले नाही तरी देखील शांतचित्ताने काम करावे. भाग्याची साथ लाभेल.

मीन : संधीचे सोने करा. विद्यार्थ्यांना नवनवीन संधी शोधण्यास योग्य काळ आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here