रात्री बारा पर्यंत ध्वनीक्षेपक वापराच्या तारखा जाहीर

जळगाव :- 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 22 या कालावधीत ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे नियम 53 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादीच्या वापराबाबत श्रोतगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्हयाच्या निकडीनुसार 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याबाबत निर्देश दिलेले आहे.

दिनांक 19 फेब्रुवारी 2022 – छत्रपती शिवाजी महाराज जयंती, दिनांक 14 एप्रिल 2022 डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिनांक 1 मे 2022 महाराष्ट्र दिवस, दिनांक 4 सप्टेंबर 2022 गणेशोत्सव 5 वा दिवस, दिनांक 6 सप्टेंबर 2022 गणेशोत्सव 7 वा दिवस, दिनांक 9 सप्टेंबर 2022 अनंत चतुर्दशी, दिनांक 3 ऑक्टोंबर 2022 नवरात्रौत्सव अष्टमी, दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 नवरात्रौत्सव नवमी, दिनांक 9 ऑक्टोंबर 2022 ईद-ए-मिलाद/कोजागिरी पोर्णिमा, दिनांक 26 ऑक्टोंबर 2022 दिपावली, दिनांक 25 डिसेंबर 2022 ख्रिसमस, दिनांक 31 डिसेंबर 2022 वर्षअखेर, तीन दिवस राखीव.

अटी व शर्ती – मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व मा. न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, सदरील सुट ही राज्य शासनामार्फत घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक जळगाव व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका जळगाव यांची राहील, सदर ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वाजवण्याकामी सुट दिल्यानंतर ध्वनी प्रदूषण ( नियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे, ध्वनी प्रदूषण ( नियमन व नियंत्रण) नियम 2000 अंतर्गत स्थापन केलेल्या प्राधिकरणाने त्यांचेकडेस प्राप्त तक्रारींवर उच्च न्यायालयाने दिनांक 16 ऑगस्ट, 2016 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विहीत पध्दतीने कार्यवाही करावी, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here