विवाहीत प्रेयसीच्या संगनमताने प्रियकराने केली तिच्या मुलाची हत्या

जळगाव : अनैतिक संबंधांत अडसर ठरणाऱ्या चौदा वर्षाच्या बालकाची त्याच्या आईने प्रियकराच्या माध्यमातून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बालकाला गळफास दिल्यानंतर झाडाला लटकवण्याचा हा प्रकार दहा दिवसांनी उघड झाला आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी सुरुवातीला बालकच्या अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासाअंती खूनाचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विवाहीता व तिच्या प्रियकराला जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद जयदेव शिंपी(38) रा. विखरण ता. एरंडोल असे या घटनेतील संशयीत प्रियकर आरोपीचे नाव आहे.

जळगाव शहरातील सावखेडा शिवार परिसरातील विवाहितेचे एरंडोल तालुक्यातील विखरण येथील प्रमोद जयदेव शिंपी याच्यासोबत सुत जुळले होते. शेतमजुरी करत असतांना दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले. आपल्या आईचे प्रमोद सोबत असलेले प्रेमसंबंध बालकाला आवडत नव्हते. दोघांचे चाळे बघून त्याच्या मनात लज्जा निर्माण होत असे. त्यामुळे तो या प्रकाराला कायम विरोध करत होता. आपल्या प्रेमसंबंधाला होत असलेल्या विरोधातून त्याला कायमचे संपवण्याचा विचार या प्रेमीयुगुलाने केला.

आपल्याला विरोध करणा-या विवाहित प्रेयसीच्या मुलास कबुतर पाळण्याचा छंद असल्यामुळे त्याला समजले होते. त्यामुळे कबुतरांसाठी नवा पिंजरा घेऊन देण्याचे आमिष दाखवत त्याने बालकाला 16 जानेवारी रोजी सकाळी बाहेर नेले. तो बालकाच्या जिवनातील अखेरचा दिवस ठरला. मुक्ताईनगर तालुक्यातील अशिरगड वनविभागाच्या परिसरात प्रमोद शिंपी याने बालकाला नेले. निर्मनुष्य जागी प्रमोदने त्याचा दोरीने गळा आवळला. त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला झाडाला लटकवून देत प्रमोद पसार झाला. त्याच्या वडीलांनी याप्रकरणी तो बेपत्ता झाल्याचे जळगाव तालुका पोलिस स्टेशनला येऊन सांगीतले. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने तांत्रिक माहिती संकलीत करत तपास पुर्ण केला. 25 जानेवारीच्या रात्री प्रमोद शिंपी याला विखरण येथून चौकशीकामी ताब्यात घेतले. सखोल चौकशीअंती त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याच्या जवाबानुसार त्याच्यासह मयत बालकाच्या आईला अर्थात त्याच्या प्रेयसीला देखील अटक करण्यात आली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here