दोन कोटीच्या मागणीसाठी व्यापा-याचे अपहरण

जालना : मोटार सायकलने जाणा-या व्यापाऱ्याचे दोन कोटी रुपयांसाठी अज्ञातांनी साठेवाडी फाट्यानजीक अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाटेत व्यापा-याला बेदम मारहाण करत वाहनातून ढकलून दिले. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली आहे. कैलास शिंगटे (मादळमोही, ता. गेवराई, जि. बीड) असे अपहरण करण्यात आलेल्या व्यापा-याचे नाव आहे.

विवाहीत प्रेयसीच्या संगनमताने बालकाची हत्याhttp://crimeduniya.com/?p=16459

वाटेत अपहरणकर्त्यांचे वाहन बंद पडल्याने ते कालव्यात ढकलून देत दुस-या वाहनाने अपहरणकर्त्यांनी पलायन केले. आपल्याजवळ एवढी रक्कम नसल्याचे सांगताच चिडलेल्या अपहरणकर्त्यांनी कैलास शिंगटे यांना मारहाण करुन वाटेत ढकलून देत पुढे पलायन केले. कालव्यात पडलेले वाहन बघून याबाबत पोलिसांना कळवण्यात आले. कालव्यानजीक शिंगटे यांच्या नावाची काही कागदपत्रे आढळून आल्यानंतर घटनाक्रमाचा उलगडा झाला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here