गिळलेले दहा रुपयांचे नाणे शस्त्रक्रियेने बाहेर

jain-advt

नाशिक : धावत्या बसमधे कंडक्टरकडून तिकिट काढत असतांना मुखात ठेवलेले दहा रुपयांचे नाणे तरुणाकडून गिळले गेले. त्यानंतर त्याला श्वास घेण्यात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. तातडीने त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुर्बिणीच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करत डॉक्टरांनी ते दहा रुपयांचे नाणे बाहेर काढले. या शस्त्रक्रियेने तरुणाला जिवदान मिळाले आहे.

नरेश नारायण सुपे असे शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या तरुणाचे तर डॉ. संजय गांगुर्डे व डॉ. उन्मेश वरवंडकर असे शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांचे नाव आहे. मोखाडा येथे बसमधून प्रवास करत असतांना शुक्रवारी कंडक्टरकडून तिकीटाच्या पैशांची देवाणघेवाण करतांना त्याने दहा रुपयांचे नाणे तोंडात ठेवले होते. ते नाणे गिळले गेले व घशातून श्वास नलिकेत जावून अडकले होते. या शस्त्रक्रियेपुर्वी तरुणास पुर्ण स्वरुपातील भुल देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here