वसुलीच्या ऑडीओ क्लिपची नगर पोलिस दलात चर्चा

jain-advt

अहमदनगर : श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशन पोलिसांची वसुलीसंदर्भात ऑडीओ क्लिप व्हायरल झाली असून खळबळ माजली आहे. काही महिन्यांपुर्वी श्रीरामपूर शहर पोलिस स्टेशनमधील चार कर्मचारी लाचेच्या सापळ्यात अडकले आहेत.

श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनमधील एक अधिकारी दुस-या कर्मचा-याला तु वसुलीला का जातो अशी विचारणा करत आहे. वसुलीच्या विषयावर दोघांमधे जोरदार संभाषण झाल्याचे क्लिपमधे ऐकू येते. दुस-या ऑडीओ क्लिपमधे दोन कर्मचारी संभाषण करत आहेत. या दोन्ही क्लिपमधे वसुली हा सामायीक विषय आहे. दुस-या क्लिपमधील एक कर्मचारी थेट पोलिस अधिक्षकांकडे तक्रार करण्याची भाषा बोलत असल्याचे ऐकू येते. या क्लिपच्या माध्यमातून नगर पोलिस दलातील वसुलीचा विषय पुढे आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here