पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदनगर : नगर पोलिस अधीक्षक कार्यालयात एका पोलिस कर्मचा-याने अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली आहे. शहर पोलिस उप विभागाचे डिवायएसपी अनिल कातकाडे व त्यांच्या सहका-यांच्या सतर्कतेने या अप्रिय घटनेला आळा बसला.

या घटनेतील पोलिस कर्मचारी पारनेर तालुक्यातील असून शिक्रापूर (पुणे) येथे नेमणूकीला आहे. घरगुती वादातून त्रस्त झाल्याने न्याय मिळत नसल्याची त्याची मानसिकता झाली आहे. त्यातून हा आत्मदहनाच्या प्रयत्नाची घटना घडली. बंदोबस्तावरील पोलिसांनी त्याला भिंगार कॅंप पोलिसांच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here