महात्मा गांधीजींच्या विचारांमध्येच वैश्विक शांतता – डॉ. काकोडकर

जळगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – वैश्विकस्तरावरील अशांतता, विषमता यासह पर्यावरणीय समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर महात्मा गांधीजींच्या जीवनातील साधेपणा या तत्त्वांवर आचरण करण्याची गरज आहे. यातूनच मानवीमूल्ये जपणारा समाज घडविण्यास मदत होईल, यासाठी मानवी संवेदना ओळखणारी दृश्यकला म्हणजे चित्रकलेच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत महात्मा गांधीजींना पोहचविणाचे महत्त्वपूर्ण कार्य गांधी रिसर्च फाऊंडेशनने आंतरराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा व राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतून केल्याचे गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी कौतूक केले.

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘रिमेंबरींग बापू’ हा विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. अनिल काकोडकर बोलत होते. आभासी पद्धतीने झालेल्या ‘रिमेंबरींग बापु’ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय अॅड मॅन आणि स्पेस डिझाइनर उदय पारकर, आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत सहभागी झाले. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन व डॉ. सुदर्शन अय्यंगार यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. अनिल काकोडकर पुढे बोलताना म्हणाले की, महात्मा गांधीजींनी समाजप्रबोधनासह आदर्श समाजाचे चित्र बघितले ते पूर्ण करण्यासाठी गांधी विचार आणि संदेशाची प्रत्येकाने जीवनात आचरणात आणले पाहिजे, सत्य आणि अहिंसेच्या वाटेवर चालले पाहिजे असे डॉ. अनिल काकोडकर म्हणाले.

जीवनातील साधेपणा यावर मार्गदर्शन करताना उदय पारकर म्हणाले की; चित्रकला देशाला सुंदर करण्याचे काम करते त्यासाठी गांधीजींच्या विचारांवर आधारित स्पर्धा वाढल्या पाहिजेत जेणे करून युवकांमध्ये महात्मा गांधीजींच्या जीवनातील साधेपणा आचरणात येईल. चित्रकला आणि जाहिरात यामधील फरक उदय पारकर यांनी सांगितला. वासुदेव कामत यांनी आज गांधीजींची प्रासंगिकता यावर मार्गदर्शन करताना सांगितले की; गांधीजींविषयी पुस्तकात वाचता येते त्यांचे विचार, आचार आपल्याला प्रेरीत करीत असतात, मात्र भाषांच्या विविधतेतून गांधीजींना समजणे महत्त्वाचे आहे. यासाठी युनिर्व्हसल अशी भाषा म्हणजे चित्रकला आहे, यातून गांधीजींना समजता येऊ शकते यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत असे सांगत कठीण प्रसंगामध्ये गांधीजींचे विचाराचे आचारण करण्याचे आवाहन वासुदेव कामत यांनी केले. ‘रिमेंबरींग बापू’ या आभासी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी केले. डॉ. अश्विन झाला यांनी सुत्रसंचालन केले.

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित ऑनलाईन राष्ट्रीय चित्रकला आणि आंतराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांकरिता ‘क्रिएटीव गांधी’, ‘कोरोना ने शिकवले’, ‘ग्रीन अर्थ- ग्रीन लाईफ’ असे विषय दिले होते. चित्रकला स्पर्धेसाठी एकूण तीन गट होते तर पोस्टर्स साठी दोन गट होते. चित्रकलेसाठीचा तीनही गटांमध्ये एकूण 895 स्पर्धेकांनी सहभाग घेतला. तर पोस्टर्स स्पर्धेसाठी एकूण 359 स्पर्धकांनी भाग घेतला. ऑनलाईन झालेल्या या स्पर्धेत दिलेला विषय, चित्रातून दिला जाणार संदेश, सोशल मिडीयामध्ये मिळालेले लाईक यासह उदय पारकर, वासुदेव कामत या मुख्य परिक्षकांसह निवड समितीमधील आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन, आनंद पाटील व कलाक्षेत्रातील जाणकरांच्या माध्यमातून विजेत्यांची निवड करण्यात आली.

राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेचा निकाल – प्रथम गट- इयत्ता ५ वी ते ८ वी मध्ये प्रथम आर्यन राजेंद्र जाधव पाटण, सातारा, द्वितीय मनशा श्री माधवन दिंडीगूल तामिळनाडू, तृतीय कृष्णा अनिलकुमार आहुजा जळगाव, उत्तेजनार्थ आयिशा शेख मुंब्रा मुंबई, कुमार अरिजीत मिश्रा भूवनेश्वर उडिसा, द्वितीय गट- ९ वी ते १२ वी मध्ये मोहित राजेंद्र मिस्त्री पाचोरा, द्वितीय तबिब अयुब पठाण नाशिक, तृतीय शिवराज संदीप ढेरे निरज सांगली, उत्तेजनार्थ विरेंद्र कृष्णा वारंगे जामनेर जळगाव, देवेंद्र राजेंद्र देवरे आसोदा जळगाव, तृतीय गट महाविद्यालयीन व खुला गटा मध्ये प्रथम मनिषा विजय तावटे नवी मुंबई, द्वितीय सुब्रमण्यम थम्पी अरूर केरळ, तृतीय ज्योर्तिदेव सिंग भूवनेश्वर उडिसा, उत्तेजनार्थ (सामाईक) सिबुलता दास केंपरा उडिसा, करूणा अशोक मेश्राम नागपूर, अर्जून प्रविण बाविस्कर हे विजेते ठरले.

आंतराष्ट्रीय पोस्टर स्पर्धा – प्रथम गट- फाईन आर्ट व महाविद्यालयीन विद्यार्थी मध्ये प्रथम अक्षय श्रीराम पाटील, द्वितीय अजय पांडूरंग विसपूते पाचोरा, तृतीय पालवी विजय जैन जळगाव, उत्तेजनार्थ दिविशा शरदप्रसाद वर्मा मुंबई, ईशिता माथूर जयपूर राजस्थान, दुसरा गट- कला क्षेत्रातील व्यावसायिक प्रथम नितीन मनोहर विंचुरे बदलापूर ठाणे, द्वितीय प्रविण सिताराम घरात मुंबई, प्रांजली ज्ञानेश्वर गावडे ठाणे, उत्तेजनार्थ उमाकांत प्रकाश नारखेडे बोदवड, राजेश भिमराव सावंत नाशिक हे विजयी ठरले.

विजयी झालेल्या स्पर्धेकांना रोख पारितोषिक – विजयी झालेल्या स्पर्धकांना रोख पारितोषिक दिले जातील. यामध्ये राष्ट्रीय चित्रकला स्पर्धेतील प्रथम गट- इयत्ता ५ वी ते ८ वी मध्ये प्रथम पारितोषिक ५०००, द्वितीय २५००, तृतीय १५००, उत्तेजनार्थ प्रत्येकी १०००, द्वितीय गट- इयत्ता ९ वी ते १२ वी मध्ये प्रथम पारितोषिक ७५००, द्वितीय ४०००, तृतीय २५००, उत्तेजनार्थ प्रत्येकी १५०० तृतीय गट- महाविद्यालयीन विद्यार्थी व खुला गटामध्ये प्रथम ११०००, द्वितीय ७०००, तृतीय ४०००, उत्तेजनार्थ प्रत्येकी २००० रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात येतील. ही पारितोषिके जैन फार्मफ्रेश फूड्स लि.ने प्रायोजित केली आहे. तसेच पोस्टर स्पर्धेमधील प्रथम गट- फाईन आर्ट व महाविद्यालयीन विद्यार्थीमधील प्रथम पारितोषिक १५०००, द्वितीय ७५००, तृतीय ४०००, उत्तेजनार्थ २०००, दुसरा गट- कला क्षेत्रातील व्यावसायिक प्रथम ३१०००, द्वितीय १५०००, तृतीय ८०००, उत्तेजनार्थ प्रत्येकी ३००० रूपये पारितोषिक देण्यात येईल. ही परितोषिके जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. ने प्रायोजित केली आहेत. महात्मा गांधीजींची हत्या संध्याकाळी ५.१७ मिनिटांनी केली गेली होती. त्याचवेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनसह जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये दोन मिनीटे मौन पाळून गांधीजींचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here