गोव्याहून आलेले करोडो रुपयांचे विदेशी मद्य सोलापुरला जप्त

सोलापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे दोन कंटेनर पकडून कारवाई केली. हे कंटेनर गोवा येथून मंगळवेढामार्गे येत असतांना छापा टाकून कारवाई करण्यात आली. 1 कोटी 1 लाख 94 हजार रुपयांचे विदेशी मद्य आणि दोन कंटेनर असा एकूण 1 कोटी 25 लाख 94 हजार रुपये मुल्य असलेला मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे.

दोन्ही कंटेनरवरील चालकांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या कारवाईत इंपिरिअल ब्ल्यू व्हिस्की 750 मिली क्षमतेचे 75 बॉक्स, इंपिरीअल ब्ल्यु व्हिस्की 180 मिली क्षमतेचे 625 बॉक्स, रॉयल स्टॅग व्हिस्की 180 मिली क्षमतेचे 50 बॉक्स, मॅकडॉल नंबर 1 व्हिस्की 180 मिली क्षमतेचे 500 बॉक्स, अ‍ॅड्रिल व्हिस्की 750 मिली क्षमतेचे 100 बॉक्स, गोवा बनावटीच्या टुबर्ग तीव्र बिअर 500 मिली क्षमतेचे 50 बॉक्स तसेच कंटेनरचा मुद्देमालात समावेश आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here