प्रवाशाच्या रुपात रिक्षात बसून चौघांची लुटमार!- एलसीबीच्या पथकाने तपासात मारला षटकार!!

जळगाव (क्राईम दुनीया न्युज नेटवर्क) : रिक्षाचालकाच्या संगनमताने अगोदरच प्रवाशाच्या रुपात बसून नंतर बसलेल्या प्रवाशाची लुट करणा-या लुटारुंना स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. वयोवृद्ध इसमाची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे अशा वृद्धांना हेरुन त्यांची लुट केल्यानंतर त्यांना वाटेत बळजबरी उतरवून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अशा स्वरुपाचे गुन्हे यापुर्वी एमआयडीसी पोलिसांच्या तपासात देखील उघडकीस आले आहेत. प्रवाशांनी सावध राहून रिक्षाचालकांची लबाडी ओळखण्याची गरज या घटनेतून पुन्हा एकवेळा निर्माण झाली आहे.

शेख जलिल शेख इब्राहिम हे 72 वर्ष वयाचे जेष्ठ नागरिक जळगाव शहरातील तांबापुरा भागात राहतात. 2 फेब्रुवारी रोजी त्यांना धुळे येथे त्यांच्या विवाहीत मुलीकडे जायचे होते. मुलीचे सोन्याचे मंगळसुत्र तिला परत देण्यासाठी ते घरुन निघाले होते. इच्छादेवी चौकातून आकाशवाणी चौकात ते रिक्षाने आले. तेथून धुळे येथे जाणा-या बसची वाट बघत असतांना त्यांच्याजवळ एक रिक्षा आली. रिक्षाचालकाने त्यांना कुठे जायचे असे विचारले. आपल्याला धुळे येथे जायचे असल्याचे शेख जलील यांनी रिक्षाचालकाला सांगितले. रिक्षात अगोदरच तिन प्रवासी बसलेले होते.

आम्ही धुळे येथेच जात आहोत असे म्हणत रिक्षा चालकाने त्यांना बसण्यास सांगीतले. रिक्षा चालकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत शेख जलील धुळे येथे जाण्यासाठी रिक्षात बसले. काही अंतर पुढे गेल्यानंतर वाटेत रिक्षाचालकासह त्याच्या साथीदारांनी आपले खरे रुप दाखवले. प्रवाशाच्या रुपात बसलेल्या रिक्षा चालकाच्या एका साथीदाराने शेख जलील यांच्या ताब्यातील चार ग्रॅम वजनाचे पंधरा हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हिसकावून घेतले. त्यानंतर पुढे विद्युत कॉलनी स्टॉपजवळ त्यांना उतरवून दिले. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गु.र.न. 29/22 भा.द.वि.392,34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी पोहेकॉ विजयसिंग पाटील, जितेद्र पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभोरे, पोना प्रितम पाटील, राहुल पाटील, नितीन बाविस्कर, अविनश देवरे, चालक पोहेकॉ भारत पाटील आदी करत होते. गुप्त बातमीदाराने दिलेली माहिती तसेच इतर माहितीच्या आधारे मोसिन खान उर्फ शेमडया नुरखान पठाण (28) रा. पिंप्राळा हुडको जळगांव, शाहरुख शेख रफीक (20) रा. पिंप्राळा हुडको जळगांव, समाधान सुमेरसिंग पाटील (33) रा. खंडेराव नगर जळगाव यांना बांभोरी येथून रिक्षासह ताब्यात घेण्यात आले.

सुरुवातीला आपल्याला काहीच माहिती नाही असे म्हणत उडवाउडवीची उत्तरे देणा-या तिघांनी पोलिसी हिसका बघताच आपला गुन्हा कबुल करण्यास सुरुवात केली. सद्दाम उर्फ पिके पिंजारी रा. खंडेराव नगर जळगांव यांच्या साथीने आपण गुन्हा केल्याचे त्यांनी कबुल केले. गुन्हयात वापरलेली ऑटो रिक्षा समाधान सुमेरसिंग पाटील याच्याकडून हस्तगत करण्यात आली. अटकेतील तिघांना पुढील कारवाईसाठी रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयात निष्पपन झालेला आरोपी मोसिन खान उर्फ शेमडया नुरखान पठाण हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. प्रवाशांना रिक्षात बसवुन त्यांची जबरी लुटमार करण्याचे त्याचे उद्योग आहेत. त्याच्याविरुद्ध जळगांव शहरातील पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. यातील सद्दाम उर्फ पिके पिंजारी रा. खंडेराव नगर जळगांव याच्या मागावर पोलिस पथक आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here