फडणवीस यांच्याकडून विरोधाला विरोध – ना. गुलाबराव पाटील

jain-advt

जळगाव : मध्य प्रदेश राज्यात बीजेपीची सत्ता असुन तेथे सुपरशॉपीत मद्य विक्रीची परवानगी आहे. मात्र महाराष्ट्रात याच निर्णयाला भाजपकडून विरोध होत आहे. देवेंद्र फडणवीस हे केवळ विरोधाला विरोध करत असल्याचे जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.

जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात माध्यम प्रतिनिधींसोबत बोलतांना गुलाबराव  पाटील यांनी भाजपच्या या भुमिकेवर आपली प्रतिक्रिया दिली. वारकरी संप्रदायाचे बंडातात्या कराडकर यांनी महिलांच्या बाबतीत मद्यपानावर  एक भाष्य केले आहे. बंडातात्या यांच्याकडून  अशी अपेक्षा नव्हती असे पालकमंत्री पाटील  यांनी म्हटले. एकीकडे मध्यप्रदेशात मद्यविक्रीला पाठींबा द्यायचा आणि महाराष्ट्रात विरोध करायचा हे भाजपचे  दुटप्पी धोरण असल्याचे पाटील यांनी म्हटले.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here