प्रेयसीला जाळून ठार केल्याप्रकरणी प्रियकरास जन्मठेप

नाशिक : डीझेल ओतून प्रेयसीला जाळून ठार करणा-या प्रियकराला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रविण कृष्णा डोईफोडे असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायधिश आर.आर.राठोड यांनी 4 फेब्रुवारी रोजी सदर निकाल दिला आहे.

नाशिकच्या आडगाव वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे असलेल्या दुशिंग मळा परिसरात सरला उर्फ सारिका बाबासाहेब गायकवाड ही तरुणी तिचा प्रियकर प्रवीण डोईफोडे याच्यासोबत रहात होती. दरम्यान 8 सप्टेंबर 2019 रोजी दोघात जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसन हत्येत झाले. प्रियकर प्रविण याने प्रेयसी सरला हिच्या अंगावर डीझेल टाकून तिला पेटवले. गंभीर स्वरुपात जळीत अवस्थेत सरला हिस लोणी वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय उपचार सुरु असतांना तिचे निधन झाले. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दिनेश मुळे यांनी या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपिविरुद्ध पुरावे संकलीत करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.आर. राठी यांनी साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपी प्रविण डोईफोडे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here