गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘कान्हदेशातील गांधी’ वेबिनार

जळगाव दि. 09 प्रतिनिधी – कान्हदेशाला संपन्न ऐतिहासीक परंपरा लाभली असून स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्त्वाचे योगदान कान्हदेशवासीयांचे आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी ऊर्जाशील ठरलेल्या या पावन भूमिमध्ये महात्मा गांधीजींनी भेट दिली. महात्मा गांधीजींच्या 1927 च्या जळगाव भेटीला 95 वर्ष पूर्ण होत आहे. यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावर वेबिनाराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील महात्मा गांधी स्टडी अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यातर्फे केले आहे.

दि. 11 फेब्रुवारी 2022, सकाळी 10.00 ते 11.15 वाजता ‘कान्हदेशात गांधी’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. विश्वास पाटील वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधीजींचे पणतू श्रीमान तुषार गांधी असतील. ऑनलाइन कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशनकरून सहभागी झालेल्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावरील संशोधनात्मक बाबींवर डॉ. विश्वास पाटील मार्गदर्शन करतील. महात्मा गांधीजी तिलक स्वराजफंडासाठी 1921, खादी फंडासाठी 1927 आणि स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण पान असलेल्या फैजपूरचे कॉंग्रेस अधिवेशनासाठी 1936 ला कान्हदेशात आले होते. त्यांच्या 1927 मधील भेटीस 11 फेब्रुवारील 95 वर्ष पुर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सहभागाचे प्रमाणपत्रासाठी https://forms.gle/8ZvghebyZ5BtL7T9A येथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कान्हदेशातील गांधी या वेबिनारमध्ये https://jains.webex.com/jains/j.php?MTID=ma6ebe216b3cc3bb0710e33b36b35209b या लिंकच्या माध्यमातून सहभागी होता येईल. यासाठी मीटिंग नंबर (Meeting number) 2555 659 0649, पासवर्ड (Password) GandhiKhandesh असा असेल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here