ट्रकमधील सामानाची चोरी करणारे एलसीबीच्या ताब्यात

जळगाव : ट्रकमधील सामानाची चोरी करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव एमआयडीसी व पहुर पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या ट्रकमधील सामान चोरीच्या दोन घटना उघडकीस आल्या आहेत. आरोपी मोबीन अहमद पटेल (47) रा.भादली ता.जि.जळगाव ह.मु. कोंढवा,पुणे व इकबाल ऊर्फ इकबाल टेलर अन्वर पटेल (48) रा. रजा कॉलनी, शेरा चौक,जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

आरोपी मोबीन अहमद पटेल यास पुणे येथून अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून चोरी गेलेल्या मालापैकी सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. उर्वरीत माल त्याने त्याचा साथीदार इकबाल टेलर याला विकल्याचे कबुल केले. त्यानुसार इकबाल टेलर याला अटक करण्यात आली. इकबालच्या जळगाव येथील घरझडतीतून सुमारे 9 लाख रुपयांचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी मोबीन अहमद यास पुढील तपासकामी पहुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. एकुण अंदाजे 19 लाख रुपयांचा मुद्देमाल तपास पथकाने हस्तगत केला आहे. आरोपी इकबाल टेलर याने एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत केलेल्या चोरीची कबुली दिली आहे. त्याच्या जवाबातून एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्ह्याची उकल झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या पथकातील पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, सफौ युनुस शेख इब्राहिम, पोहकॉ सुनिल पंडीत दामोदरे, अश्रफोउद्दीन निजामोउद्दीन शेख, जितेंद्र राजाराम पाटील, लक्ष्मण अरुण पाटील, अक्रम शेख याकुब, महेश आत्माराम महाजन, संदिप श्रावण सावळे, पोना किशोर ममराज राटोड, रणजित अशोक जाधव, श्रीकृष्ण खंडेराव देशमुख, नितीन प्रकाश बाविस्कर, अविनाश बापुराव देवरे, पोकॉ विनोद सुभाष पाटील, ईश्वर पंडीत पाटील, चापोकॉ अशोक पाटील, मुरलीधर बारी आदींसह पहुर पो.स्टे.चे पोउनि. अमोल गर्जे, पोहेका विनय सानप, पोकॉ ज्ञानेश्वर ठाकरे आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here