नगर जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड खटल्याचे कामकाज अंतिम टप्प्यात

अहमदनगर :  पाथर्डी तालुक्यातील जवखेडा खालसा येथील गाजलेल्या तिहेरी हत्याकांड खटल्याची सुनावणी आजपासून सुरु होत असून न्यायालयीन कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचे म्हटले जात आहे. राज्यभर गाजलेल्या या हत्याकांड प्रकरणी सरकार पक्षाच्या वतीने अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता आरोपींच्या बाजूने अंतिम युक्तीवदाची सुरुवात होणार आहे. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या न्यायालयासमक्ष या खटल्याची सुनावणी होत आहे.

पोलिस तपासात या गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीच आरोपी निष्पन्न झाला आहे. मयत  कुटुंबियांच्या भावकीतील तिघा पिता पुत्रांना अटक झालेली आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव पाटील यांनी एकुण 53 साक्षीदार तपासले आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here