आजचे राशी भविष्य (26/4/2022)

jain-advt

मेष : वेळच्या वेळी वैद्यकीय सल्ल्याने आरोग्य जपावे.

वृषभ : तत्वे बाजूला ठेवून व्यवसायात कामे करावी लागतील. आर्थिक नियोजन कोलमडू शकते.

मिथुन : उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. आपल्या गुणांचे कौतुक होईल.

कर्क : पारंपारिक व्यवसाय करणा-यांना चांगला लाभ होईल. अडचणीत जेष्ठांचा सल्ला घ्यावा लागेल.

सिंह : विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. काही जणांना आर्थिक चणचण भासेल.

कन्या : कामाचा ताणतणाव चेह-यावर जाणवेल. प्रवास टाळणे हिताचे राहील.

तुळ : धार्मिक कामात सहभाग घ्याल. जुनी येणी वसुल होतील.

वृश्चिक : रखडलेली शासकीय कामे मार्गी लागतील. यंत्राचा वापर जपून करावा.

धनु : साधारण दिवस राहील. बेतापेक्षा जास्त धाडस करु नये.

मकर : कठोर शब्द शक्यतो टाळावे लागतील. पाहुण्यांचे आगमन होवू शकते.

कुंभ : मेहनतीचे फळ मिळेल. यशाचे कौतुक देखील होईल.

मीन : घरगुती दुरुस्तीची कामे करावी लागतील. व्यापारी वर्गाला चांगला दिवस. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here