भाजप खासदारांच्या कार्यालयासमोर कॉंग्रेसचे आंदोलन

जळगाव : देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राची माफी मागावी या मागणीसाठी जळगाव लोकसभा मतदार संघाचे भाजपचे खासदार उन्मेश पाटील यांच्या चाळीसगाव स्थित कार्यालयाबाहेर कॉंग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन छेडण्यात आले. जळगाव जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदिपराव पवार यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.

छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अवमान करणा-या पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राची माफी मागावी हा या आंदोलनच्या माध्यमातून मागणी यावेळी करण्यात आली होती. शर्म करो शर्म करो, मोदींनी माफी मागितली पाहिजे, छत्रपतींच्या महाराष्ट्राचा अपमान करणार्‍यांनी जनतेची माफी मागितलीच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. कॉंग्रेसचे जळगाव शहराध्यक्ष शाम तायडे, पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, अशोक खलाने, चाळीसगाव तालुका अध्यक्ष अनिल निकम,शहर अध्यक्ष देवेंद्र पाटील,भागवत सुर्यवंशी, गोकुळ बोरसे (अमळनेर) महिला जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ,राहुल मोरे, इरफान मनियार, इरफान मनियार शहर रविंद्र पोळ, शहर अध्यक्षा अर्चना पोळ, दिलीप शेंडे, मोरसिंग चव्हाण, आशुतोष पवार, अमजद मौलाना आदी या प्रसंगी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here