अशोकदादा चौधरी यांचा लग्नाचा वाढदिवस उत्साहात

जळगाव : जामनेर येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. विकास चौधरी यांचे पिताश्री अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा आज 41 वा वाढदिवस आहे. जामनेर येथील हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तीमत्व म्हणून ओळख असलेले अशोकदादा चौधरी यांच्या लग्नाचा वाढदिवस जल्लोषात आणि घरगुती वातावरणात साजरा करण्यात आला. अशोकदादा चौधरी यांचा वाढदिवस मोठ्या स्वरुपात साजरा करण्याचे नियोजन त्यांचे लाडके सुपुत्र अ‍ॅड. विकास चौधरी यांनी केले होते. मात्र कोविड अनुरुप व्यवहार लक्षात घेत त्यांनी आपले पिताश्री अशोकदादा आणि मातोश्री सौ. शोभा यांचा वाढदिवस घरगुती वातावरणात मात्र उत्साहात साजरा केला. आपल्या मुलांच्या विचाराला अशोकदादा चौधरी यांनी सहमती दिली. याप्रसंगी त्यांचे मोठे सुपुत्र अ‍ॅड. विकास व त्यांची पत्नी योगिता, कनिष्ठ सुपुत्र प्रसन्न व त्यांची पत्नी तेजस्विनी, नातू लक्ष, अनुज, नात प्रतिज्ञा, मुली सविता, जान्हवी तसेच दोन्ही जावई असा पुर्ण परिवार उपस्थित होता.

अशोकदादा चौधरी यांनी आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी बोलतांना म्हटले की सहचारीणी शोभाताई यांच्यासोबत जिवनातील 41 वर्षाचा कालखंड कसा लोटला हे लक्षातच आले नाही. संसाराचा रहाटगाडा ओढण्याकामी शोभाताई यांचा मोलाचा आणि सिंहाचा वाटा असल्याचे अशोकदादा चौधरी यांनी यावेळी आवर्जून सांगीतले. मुलांचे शिक्षण व पालणपोषण करतांना होणारी परवड हसतमुखाने झेलण्याचे कसब शोभाताई यांनी दाखवून दिल्याची भावना यावेळी अशोकदादा चौधरी यांनी व्यक्त केली. अशोकदादा चौधरी यांची विकास व प्रसन्न ही दोन्ही मुले, सुना व नातू यांनी उत्साहात घरगुती वातावरणात त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here