जळगाव – मुंबई विमानसेवेचे सुधारीत वेळापत्रक गैरसोयीचे

जळगाव : जळगाव येथून अहमदाबाद, मुंबई, कोल्हापूर व नांदेड अशा चार शहरांना ट्रु-जेट कंपनीतर्फे विमान प्रवास सेवा पुरवली जात होती. गेल्या 7 फेब्रुवारीपासून ती बंद आहे. ही विमानसेवा आता सुरु होत आहे. आता सुधारीत वेळापत्रकानुसार दुपारी कोल्हापूरहून मुंबईला विमान येईल ते मुंबईहून तिन वाजता जळगावला येईल आणि 3 वाजून 20 मिनीटांनी मुंबईसाठी रवाना होईल. तेथून ते पुढे नांदेडसाठी रवाना होणार आहे. आता सुधारीत वेळापत्रकानुसार सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार असे चार दिवस मुंबईसाठी विमानसेवा राहणार आहे.

जळगाव – मुंबई विमानसेवा वारंवार खंडीत होत असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक वेळी या विमानसेवेच्या वेळापत्रकात होणारा बदल देखील गैरसोयीचा ठरत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पंधरा दिवसापासून मुंबईसाठी बंद असलेली विमानसेवा आता सुरु होत आहे. मात्र पुर्वीची सकाळी 9 वाजून 50 मिनिटांची वेळ आणि दिवस यात बदल करण्यात आला आहे. अगोदर निश्चित करण्यात आलेली सकाळची वेळ प्रवाशांसाठी सोयीची होती. या वेळेत प्रवासीवर्ग मुंबईला दुपारी पोहोचून सायंकाळपर्यंत आपले कामकाज पुर्ण करु शकत होता. मात्र ती वेळ आता दुपारी 3.20 वाजता करण्यात आली आहे. ही बदलण्यात आलेली वेळ गैरसोयीची असल्याचे म्हटले जात आहे. या वेळेत कोणतेही कार्यालयीन कामकाज होणार नसून मुंबईला मुक्कामी राहण्याची वेळ प्रवाशांवर येणार आहे. त्यापेक्षा रात्रीच्या रेल्वेने जावून कामकाज आटोपून पुन्हा दुस-या दिवशी रात्री परत येता येणार आहे. यापुर्वी आठवड्यातून पाच दिवस अहमदाबाद व मुंबईसाठी विमानसेवा सुरु होती. मुंबईहून कोल्हापूरसाठी तीन दिवस आणि नांदेडसाठी आठवड्यातून दोन दिवस सेवा सुरु होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here