पोलिसांच्या वाहनाची ट्रॅक्टरला धडक – दोघे जखमी

कन्नड : रात्र गस्तीवरील पोलिसांच्या वाहनाची उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक बसल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिस उप निरीक्षक शेषराव उबाळे आणि पोलिस नाईक युसुफ शेख असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता सदर घटना घडली.

टापरगावकडून कन्नडकडे रात्र गस्तीदरम्यान हतनूर उड्डाणपुलावर वाहन ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात वाहन ट्रॅक्टरवर धडकले.  या घटनेची माहिती समजताच  पोलिस निरीक्षक बालक कोळी, बीट जमादार सतीश खोसरे, पोलिस नाईक संजय आटोळे, कैलास करवंदे, शिंदे, संतोष ढोले आदींनी घटनास्थळी धावा घेत जखमींना दवाखान्यात दाखल केले. कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनला याप्रकरणी नोंद घेण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here