अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती

जळगाव : मावसभावाने केलेल्या अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या अत्याचार प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शिरसोली परिसरात खळबळ माजली आहे.

पिडीत मुलगी नववीच्या वर्गात शिकते. सकाळी वडीलांसोबत शाळेत जाणे व सायंकाळी वडिलांसोबत घरी परत येणे असा तिचा नित्यक्रम होता. शाळा सुटल्यानंतर दुपार ते सायंकाळपर्यंत ती तिच्या मामाच्या घरी रहात होती. मामाच्या घरी तिचा मावशीचा मुलगा राहण्यास आला होता. एके दिवशी घरी कुणी नसतांना मावशीच्या मुलाने संधी साधून या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा एके दिवशी संधी साधून त्याने तिच्यासोबत कुकर्म केले. या घटनेतून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. आपल्या मुलीचे पोट मोठे दिसत असल्यामुळे तिच्या  आईला शंका आली. त्यामुळे तिला तिच्या आईने 21 फेब्रुवारी रोजी वैद्यकीय तपासणीकामी सामान्य रुग्णालयात नेले. तपासणीअंती ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्याचार करणा-या अल्पवयीन बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक रविंद्र गिरासे व सचिन मुंडे यांनी या तपासात सहभाग घेतला. अत्याचार करणा-या अल्पवयीन बालकास बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here