बालिकेवर अत्याचार – धरणगावला निषेध मोर्चा

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील 62 वर्षाच्या वृद्धाने आठ व सहा वर्षाच्या बालिकांवर अत्याचार  केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून वृद्धाला अटक  करण्यात आली आहे. 

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासह अत्याचार करणा-या नराधमला कडक  शासन होण्याच्या मागणीसाठी धरणगाव शहरात मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या निषेध मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. सकाळी आठ वाजेपासून बालाजी मंदिरापासून या मुकमोर्चाला सुरुवात झाली व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. कविता महाजन, प्रा. ज्योती जाधव, नाजनिन शेख, उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन आदींची उपस्थिती होती. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा तसेच प्रसिद्ध विधीज्ञ उज्वल निकम यांची नेमणूक होण्याची मागणी यावेळी  करण्यात आली. नायब तहसिलदार लक्ष्मण सातपुते व पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना लहान मुलींच्या हस्ते यावेळी निवेदन देण्यात आले.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here