जळगाव जिल्ह्यात 8 मार्चपर्यंत 37 (1) (3) कलम लागू

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 8 मार्च,2022 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) लागू करण्यात आले आहे.

या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश ज्यांना लाठी किंवा तत्सम वस्तु घेतल्याशिवाय चालता येत नाही अशा वृद्ध अथवा अपंग इसमांना लागू राहणार नाही. व प्रेत यात्रा व लग्न समारंभ यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here