चटई कंपनी मालकाची दोन लाख रुपयात फसवणूक

जळगाव : प्लॅस्टीक रॉ मटेरिअलच्या ऑर्डरपोटी दोन लाख रुपये एनईएफटी द्वारे अ‍ॅडव्हान्स दिल्यानंतर देखील मालाचा पुरवठा न करता फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष महिपत इंगळे असे फसवणूक झालेल्या व्यापा-याचे नाव असून त्यांची शक्ती पॉलीमर्स नावाची चटई तयार करण्याची कंपनी आहे. चटई तयार करण्याकामी लागणा-या रॉ मटेरिअलच्या ऑर्डरचे पैसे आगाऊ दिल्यानंतर देखील त्यांना माल मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे.

कुंदनलाल असे नाव सांगून फोनवर व्यवहार करणा-या तथाकथीत व्यापा-याने संतोष इंगळे यांची फसवणूक केली आहे. शाम एंटरप्रायजेस प्लॉट क्रमांक 14/15 बाल विहार जगतपुरा जलपूर या नावाने तथाकथीत कुंदनलाल या व्यापा-याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here