मोबाईल चोरी करणारे दोघे अटकेत

जळगाव : जळगाव शहरातील स्टेडीयम कॉम्प्लेक्स परिसरातून चोरी झालेल्या मोबाईलचा शोध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल मोबाईल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील मोरया कॉलनीतील रहिवासी गिरीष जगताप हा चोरीचा मोबाईल वापरत असल्याची माहिती पो.नि.किरणकुमार बकाले यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे हे.कॉ. विजयसिंग पाटील, जितेंद्र पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, संदीप सावळे, पोलिस नाईक नितीन बाविस्कर, अविनाश देवरे, राहुल पाटील, प्रितम पाटील, इश्वर पाटील आदींनी सापळा रचून कुसुंबा बस स्टॉप येथे जावून गिरीष जगताप यास ताब्यात घेतले. त्याने मोबाईल चोरीचा गुन्हा कबुल करत विस हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून दिला. या चोरीत त्याचा साथीदार सावंत संजय पाटील (कुसुंबा-जळगाव) हा देखील सहभागी असल्याचे त्याने कबुल केले. पुढील तपासकामी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here