धावत्या रेल्वेतून पडली महिला – पोलिस अंमलदाराने वाचवला जीव

जळगाव : धावती रेल्वे पकडतांना घाईगर्दीत महिलेचा हात निसटल्याने, पाय-यांवरुन पाय घसरलेल्या महिलेचा जीव वाचवणा-या पोलिस अंमलदाराचा पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी सत्कार केला आहे. दिनेश विश्वनाथ बडगुजर असे सत्कारार्थी जिल्हा विशेष शाखेतील पोलिस अंमलदाराचे नाव आहे. (सोबत व्हिडीओ)

15 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 11040 अप गोंदीया कोल्हापूर ही गाडी जळगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर सुमारे सात वाजेच्या दरम्यान आली होती. यावेळी अनेक जण धावत्या रेल्वेच्या बोगीत चढण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान सौ. सुनिता पांडुरंग बेडीस (50) या आपल्या पतीसह धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांचा हात निसटून पाय घसरला. दरम्यान रेल्वेने वेग धरला होता. यावेळी जळगाव पोलिस दलातील विशेष शाखेतील अंमलदार दिनेश बडगुजर हे आपले प्लॅटफॉर्मवरील कामकाज आटोपून बाहेर जाण्याच्या तयारीत असतांना त्यांचे या घटनेकडे लक्ष गेले. सौ. सुनिता बेडीस यांचा पाय धावती रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या आत अडकला होता. त्याचवेळी प्रसंगावधान राखत बडगुजर यांनी तातडीने त्यांना बाहेर खेचून काढले.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज संकलीत करण्यात आले. दिनेश बडगुजर यांनी दाखवलेल्या कामगिरीची दखल घेत पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी प्रशस्तीपत्र देत त्यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित असलेले अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उप अधिक्षक (गृह) विठ्ठल ससे, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी देखील त्यांचा सन्मान केला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here