पोलिसांशी हुज्जत घालणा-याला एक वर्ष कैद

अमरावती : ड्युटीवर कार्यरत असलेल्या पोलिसाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अमरावती जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. 6) बी. जी. धर्माधिकारी यांच्या न्यायालयाने एक वर्षाची कैद, दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास अशा स्वरुपाची शिक्षा सुनावली आहे.

अमोल उत्तमराव मोहोड (38), रा. रुक्मिणीनगर अमरावती असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 19 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी दस्तुरनगर चौकात राजापेठचे तत्कालीन पोलिस उप निरीक्षक श्रीकांत झगडे यांच्यासह त्यांच्या सहका-यांनी नाकाबंदी केली होती. नाकाबंदी दरम्यान अमोल मोहोड हा त्याच्या ताब्यातील दुचाकीने एमआयडीसी कडून दस्तुरनगर चौकाच्ग्या दिशेने जात होता. त्याच्या दुचाकीवर पुढील बाजूने नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. मात्र त्याने पोलिसांसमवेत हुज्जत घालण्यास सुरुवात केली.

या घटनेप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत झगडे यांनी राजा पेठ पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवला. गुन्ह्याचा तपास पूर्ण करत न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्या. बी. जी. धर्माधिकारी यांच्या न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने  अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मंगेश भागवत यांनी पाच साक्षीदारांची तपासणी केली. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरण्यात आला. न्यायालयाने अमोल मोहोड यास शिक्षा सुनावली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here