घरफोड्या करणारी टोळी नगरला जेरबंद  – 17 गुन्हे उघडकीस

अहमदनगर : अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने घरफोड्या करणा-या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद करुन सतरा गुन्हे उघडकीस आणले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांची तब्बल 37 जणांची विविध पथके याकामी कार्यरत होती.

नगर जिल्ह्यातील चास येथे 24 फेब्रुवारी रोजी घुंगार्डे वस्तीवर भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडला होता. सदर घरफोडीचा प्रकार राम बाजीराव चव्हाण (20) रा. आष्टी, जि. बीड या सराईत गुन्हेगाराने केला असल्याची माहिती पो.नि. अनिल कटके यांना समजली होती. त्याची टोळी घरफोड्या करण्यासाठी मोटारसायकलने ये – जा करत असल्याची देखील माहिती तपासात पुढे आली होती. जामखेड तालुक्यातील आठवड घाटात लावलेल्या सापळ्यात आष्टीकडून नगरच्या दिशेने तिन मोटार सायकली येतांना पथकाला दिसल्या. त्यापैकी चौघांना अडवून केलेल्या चौकशीत घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. मात्र दरम्यान एका मोटारसायकलवरील दोघे मागच्या मागे यु टर्न घेत पलायन करण्यात यशस्वी झाले. राम बाजीराव चव्हाण, तुषार हबाजी भोसले, प्रविण उर्फ भाज्या हबाजी भोसले व विनोद हबाजी भोसले (पिंपरखेड ता. आष्टी जिल्हा बिड) अशी अटकेतील चौघांची नावे आहेत.

मोटारसायकलने नगर जिल्ह्यातील विविध ठिकाणी जाऊन घरफोडी करायची व विविध रस्त्याने परत जाण्याची या टोळीची पद्धत होती. या टोळीने नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, नगर, पाथर्डी, शेवगाव व राहुरी आदी तालुक्यात सतरा घरफोड्या केल्या आहेत. घरफोडी केलेला मुद्देमाल ताब्यातील टोळीने पोलिसांना काढून दिला आहे. स.पो.नि. सोमनाथ दिवटे, फौजदार सोपान गोरे यांच्यासह सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, मनोज गोसावी, संदीप पवार, दत्ता गव्हाणे, मच्छिंद्र बर्डे, विनोद मासाळकर, विजय वेठेकर, बबन मखरे, संदीप घोडके, विश्वास बेरड, भाऊसाहेब कुरुंद, देवेंद्र शेलार, ज्ञानेश्वर शिंदे, सचिन अडबल, संदीप चव्हाण, विजय ठोंबरे, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, रोहित मिसाळ, लक्ष्मण खोकले, विशाल दळवी, रविंद्र घुंगासे, योगेश सातपुते, जालिंदर माने, आदींच्या पथकाने या कामगिरीत सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here