ठिबक सिंचन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या समृद्धीचा राजमार्ग – डॉ. बी. डी. जडे

jain-advt

जळगाव : पारंपारीक शेतीमध्ये पिकांचे उत्पादन कमी का मिळते कारण लागवडीमध्ये वापरण्यात येणाऱ्या निविष्ठांची कार्यक्षमता अवधी ३० ते ४० टक्के मिळत असल्याने पारंपारिक पद्धतीने पिकांचे उत्पादन कमी मिळते व नफा ही कमी मिळतो. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने निविष्ठांची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळेल त्यामुळे उत्पादन अधिक मिळून आर्थिक फायदा अधिक मिळेल. राज्यामध्ये पाण्याची टंचाई विजेची टंचाई, मजुरांची उलब्धता, खतांची टंचाई ह्या मोठ्या समस्या शेतीमध्ये आहेत ह्या समस्यांवर उपाय ठिबक सिंचन तंत्रज्ञान असुन शेतकऱ्यांच्या समृद्धीचा ठिबक सिंचन तंत्र राजमार्ग आहे असे जैन इरिगेशनचे वरीष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. बी. डी. जडे कोळपिंप्री ता. पारोळा येथे साईकृपा ठिबक एजन्सी आयोजित पीक परिसंवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

व्ही. एम. पाटील यांच्या मोसंबी, आंबा, केळी, गहू, हरभरा पिके असलेल्या शेतांमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. बी. डी. जडे ह्या कापूस आणि मका लागवडीच्या प्रगत तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले. कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी १० क्विंटल आणि बगायती कापूस पिकाचे ठिबक सिंचन पद्धतीवर एकरी २० क्विंटल तसेच मका पिकाचे एकरी १०० क्विंटल उत्पादन कसे मिळविता येईल आणि एकाच पिकासाठी घेतलेला ठिबक सिंचन संच १२५ पेक्षा अधिक पिकांसाठी कसा वापर करता येईल ठिबक मधून पाण्यात विरघळणारी खते कशी द्यावीत ह्यावर मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी भरत वारे ह्यांनी कृषी विभागाच्या योजनांबाबत माहिती दिली.

जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक दिलीप बऱ्हाटे ह्यांनी ठिबक सिंचन कसा निवडावा, संच दीर्घकाळ कार्यरत राहण्याकरीता गुणवत्ता कशी असावी, पाण्याच्या अचुक व्यवस्थापनाकरीता ऑटोमेशन तंत्राचा वापर करण्याची गरज असल्याचे सांगितले. ठिबक सिंचनद्वारे जमीन फक्त वाफसा अवस्थेत ठेवावी. कार्यक्रमाचे अध्यक्ष जि.प. सदस्य रोहीदास दाजी होते. त्यांनी शेतकऱ्यांनी ठिबकमधुन फक्त पाणी न देता पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर म्हणजे फर्टिगेशन करावे. पारोळा पंचायत समितीचे उपसभापती अशोक नगराज पाटील, दहीवेलचे प्रगतीशील शेतकरी शिवाजी सुकदेव पाटील, गणेश पाटील तसेच कोळप्रिंपी परिसरातील अनेक शेतकरी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक साईकृपा ठिबकचे संचालक सुदामभाऊ ह्यांनी केले. कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन संजीव भोई यांनी केले. विक्री अभियंता यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here