भुसावळचा तरुण नाशिकच्या विवाहितेच्या प्रेमात!- आत्महत्या करताच त्याचा मृतदेह टाकला रस्त्यात!!

नाशिक : चार मुलांची आई तसेच वयाने मोठी असलेल्या महिलेच्या प्रेमात पडलेल्या भुसावळच्या तरुणाने नाशिकला आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या घरात त्याने केलेली आत्महत्या दडपण्यासाठी संबंधीत महिलेने तिचा मुलगा आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याचा मृतदेह महामार्गावर टाकून अपघाताचा बनाव केला. मात्र पोलिस तपासात खरा प्रकार उघडकीस आला आहे. रमेश रविंद्र मोरे (25) असे आत्महत्या केलेल्या भुसावळ येथील तरुणाचे नाव आहे. त्याचे काका राजु मोरे (जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादींनुसार याप्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनला संशयीत महिलेसह दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वयाने मोठ्या असलेल्या 45 वर्षाच्या महिलेवर रमेश मोरे याचे प्रेम जडले होते. बस प्रवासात दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात होताच रमेश तिच्या प्रेमात दिवाना झाला होता. चार मुलांची आई असलेल्या प्रेयसी असलेल्या महिलेच्या घरीच तो ओझर परिसरात रहात होता. नंतर मात्र ती महिला त्याचा छ्ळ करु लागली. तिच्या छळाला वैतागून त्याने त्या महिलेच्या घरातच आत्महत्या केली. त्याची आत्महत्या दडवण्यासाठी महिलेने तिचा विस वर्षाचा मुलगा व त्याच्या साथीदारांच्या मदतीने रमेशचा मृतदेह महामार्गावर टाकून देण्यात आला.  रमेशचा अपघाती मृत्यु झाल्याचा बनाव करण्यात आला होता.

याप्रकरणी सुरुवातीला आडगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली होती. मयताच्या गळ्यावर व्रण असल्याचे शव विच्छेदनात दिसून आले. गळफासामुळे त्याचा मृत्यु झाल्याचे वैद्यकीय अहवालात कारण पुढे आल्यानंतर पोलिस तपासाला वेग आला. सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दि. 26 मार्च रोजी दहावा मैल एच. पी. पेट्रोलपंपाजवळ एक इसम मयत अवस्थेत आढळून आला होता.  तपासात त्याचे नाव रमेश रवींद्र मोरे (25)‎ रा. भुसावळ असे उघड झाले. त्याच्या घरी तपास केला असता त्याची प्रेमकहानी पुढे आली. ‘तू माझ्या सोबतच लग्न कर’ असा‎ तगादा संबंधीत महिला रमेशकडे लावत होती. तिच्या दमदाटीला वैतागून त्याने गळफास घेतल्याचे निष्पन्न झाले.  मयताचे काका राजु मोरे यांच्या फिर्यादीनुसार आडगाव पोलिसात तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमानुसार आडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here