25 हजाराची रक्कम चोरणारा सराईत चोरटा जेरबंद

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केटमधील दुकानातून पंचवीस हजार रुपयांची चोरी करणा-या चोरट्यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. विठ्ठल उर्फ उमर आत्माराम नेरकर (रा. दत्त नगर मेहरुण जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून तो पोलिसांच्या अभिलेख्यावरील सराईत गुन्हेगार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य मार्केट परिसरात दिपककुमार लढ्ढा या नावाची फर्म आहे. या 20 क्रमांकाच्या दुकानातील चॅनल गेटचे 6 मार्च 2022 रोजी विठ्ठल नेरकर याने कुलुप तोडून प्रवेश मिळवला होता. येथून त्याने 25 हजार रुपयांची चोरी केली होती. या घटनेप्रकरणी दुकान मालक राहुल लढ्ढा यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वि.457 आणि 380 नुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळालेल्या खबरीनुसार हा गुन्हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विठ्ठल नेरकर याने केल्याचे उघड झाले.

सदर आरोपीतास सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पो.हे.का. रामकृष्ण पाटील, पो.हे.कॉ. मिलींद सोनवणे, पोलिस नाईक हेमंत कळसकर, पोलिस नाईक सुधीर साळवे, पोलिस नाईक विकास सातदीवे, पोलिस नाईक सचीन पाटील, पोलिस नाईक योगेश बारी आदींनी शिताफीने दत्तनगर – मेहरुण जळगांव येथून ताब्यात घेत अटक केली. त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबुल केला. त्याला अटक करण्यात आली. त्याला न्या. ए.एस.शेख यांच्या न्यायायलयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. सदर गुन्हयाचा पुढील तपास पो.नि. प्रताप शिकारे यांंच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. रामकृष्ण पाटील करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here