चॉईस मोबाईल क्रमांक मागणा-याची हेरली आवड लुबाडण्यासाठी दोघांनी केली व्यावसायीकाची निवड

नाशिक : व्हीआयपी मोबाईल क्रमांक मागणा-या हैद्राबाद येथील व्यावसायीकाची नाशिकच्या दोघा ठगांनी लाखो रुपयात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. कुणाल राजेंद्र खैरनार (रा. बडदेनगर) आणि हेमंत राजेंद्र ओसवाल (रा. हिरवाडी) असे फसवणूक करणा-या नाशिकच्या दोघा ठगांची नावे आहेत. दोघांना अटक करण्यात आली असून हैद्राबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अटकेतील दोघे एका मोबाईल कंपनीचे वितरक आहेत.

हैद्राबाद येथील एका व्यावसायीकाला व्हीआयपी मोबाईल क्रमांक हवा होत. तो व्यावसायीक कुणाल खैरनार आणि हेमंत ओसवाल या दोघा ठगांच्या संपर्कात आला. दोघांनी त्याला सलग 0,1, 5, 8, 786 क्रमांक असणारे मोबाईल क्रमांक देण्याची तयारी दाखवली. या क्रमांकासाठी प्रत्येकी दहा ते पन्नास हजाराची रक्कम हैद्राबाद येथील व्यावसायीकाने दोघांच्या बॅंक खात्यात वेळच्या वेळी वर्ग केली. मात्र हे क्रमांक अस्तित्वात नसल्याचे आणि बंद असल्याचे व्यावसायीकाच्या लक्षात आले. त्याने आपल्या पैशांची मागणी दोघांकडे केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर हैद्राबाद येथील व्यावसायीकाने स्थानिक सायबर पोलिसात तक्रार दाखल केली. हैद्राबाद पोलिसांनी नाशिकला पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांची भेट घेत आपली व्यथा कथन केली. त्यामुळे मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली असून हैद्राबाद पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. वरिष्ठ निरिक्षक आचल मुदगल यांच्या पथकाने सदर कारवाई केली.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here